Tuesday, January 11, 2011

श्री शिवाजी महाराजांची आरती

" फर्ग्युसन कॉलेज मधील आर्यन संघ नावाच्या चवथ्या भोजन संघा मध्ये दर आठवड्यास म्हणण्यासाठी हि आरती 'स्वातंत्र्य वीर सावरकर' यांनी रचली. "

 जयदेव जयदेव जय जय शिवराया
या या अनन्यशरणा आर्या ताराया !!

आर्यांच्या देशावरी म्लेन्छाचा घाला
आला आला सावध हो शिवभूपाला !
सद्दिता भूमाता दे तुज हाकेला
करुणारव भेदुनी तव हृदय न का गेला? !!

श्री जगदंबा जीस्तव शुम्भादिक भक्षी
दशमुख मर्दुनी जी श्री रघुवर संरक्षी !
ती पुता भूमाता म्लेन्छाही छळता
तुजविण तिज शिवराया कोण दुजा त्राता? !!

त्रस्त आम्ही दीन आम्ही शरण तुला आलो
 परवशतेच्या पाशी मरणोन्मुख झालो !
साधु परित्राणाय दुष्कृती नाशाया
भगवन भगमद्दिता सार्थ कराया या !!

ऐकुनिया आर्यांचा धावा महिवरला
करुणोक्ते स्वर्गी श्री शिवनृप गहिवरला !
देशास्तव शिवनेरी घेई देहाला
देशास्तव रायगडी ठेवी देहाला !
देश स्वातंत्र्याचा दाता जो झाला
बोला तछ्रीमत्शिवनृप कि जय बोला !!

                 (स्वातंत्र्य वीर विनायक दामोदर सावरकर.)
राजाधिराज महाराज शिवराय राज श्री छत्रपती
कर्तव्यदक्ष सिंहासिनाधीश्वर छत्रपती शिवराय
दुर्गपती गज अश्व पती ! सुवर्ण रत्न श्रीपती !
अष्टावधान प्रेष्टीत ! अष्टप्रधान वेष्टित !
राजनीती धुरंदर ! प्रौढप्रताप पुरंदर !

क्षत्रिय कुलावतंस सिहासानाधीश्वर महाराजाधिराज
छत्रपती शिवाजी महाराज कि जय!