Friday, November 11, 2011

केसरी गुहे समीप
दुमदुमी निनादल्या, नौबती कडाडल्या, दशदिशा धडाडल्या,
केसरी गुहे समीप, मत्त हत्ती चालला, मत्त हत्ती चालला, मत्त हत्ती चालला,
वाकुनी आदिलशहास कुर्निसात देवूनी,
प्रलयकाळ तो प्रचंड खान निघे तेथुनी,
हादरली धरणी व्योम शेषही शहारला !!

खान चालला पुढे अफाट सैन्य मागुती
उंट हत्ती पालख्या ही रांग लांब लांबती
टोळधाड ही निघे स्वतंत्रता गिळायला !!

श्रवणी तप्त तैलसे शिवास वृत्त पोचले
रक्त तापले कराल खड्ग सिद्ध जाहले
मर्दव्यास कलियास कृष्ण सिद्ध जाहला !!

तुळजापूरची भवानी माय महानमंगला
राउळात अधमखान दैत्यासह पोचला
मूर्ती भंगली मनात चित्रगुप्त हसला !!

सावधान हो शिवा वैऱ्याची रात्र ही
काळ येतसे समीप साध तूच वेळ ही
देऊनी बळी अजास तोषवी भवानीला !! 
केसरी गुहे समीप, मत्त हत्ती चालला, मत्त हत्ती चालला, मत्त हत्ती चालला !!



कभी तुम मर रहे हो धोनी के लंबे बालो के लिए.
कभी मर रहे हो गाँधी के दिए जंजालो के लिए........
आज स्वर्ग से राणा प्रताप भी कहते होंगे......
यार शिवा जी हम भी क्यो मर गये इन सालो के लिए ???

No comments:

Post a Comment